मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे.शरद पवार यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच विविध नेत्यांनी त्यांची विचारपूस केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवार यांची फोनद्वारे विचारपूस केली आहे. याबाबत शरद पवार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून माहिती देण्यात आली आहे. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार!’ असं ट्विट करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार! @OfficeofUT@CMOMaharashtra
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
३१ मार्च रोजी पवारांवर शस्त्रक्रिया होणार !
पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना 31 मार्चला रुग्णालयात ऍडमिट करण्यात येणार आहे. शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईलअशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठी कलाकार झाले रंगात बेधुंद ; जोडीदारासोबत पहिलीच होळी
- रितेश-जेनेलियाने रोमाँटिक अंदाजात साजरी केली होळी ; व्हिडिओवर चाहते फिदा…
- भारताचा स्टार गोलंदाज आयपीएलसाठी सज्ज…
- राज्यातले महा वसुली आघाडी सरकार लवकरच अग्नीत जळून भस्मसात होईल – आचार्य भोसले
- ‘बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार,त्यांना लवकर बरं वाटू दे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

