Share

हा तर सोमय्यांनी लावलेला जावई शोध; सोमय्यांनी केलेल्या आरोपावर मुश्रीफांचे स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. दरम्यान, सोमय्या हे मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबाबत सोमय्या यांनी पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. यानंतर मुरगूड येथे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हसन मुश्रीफ यांनी त्यांचा जावयाशी मिळून १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला. ही कला पण एक वेगळीच कला आहे.मुश्रीफ यांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याचे टेंडर हे स्वतःच स्वतःच्या जावयाच्या कंपनीला दिलं. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्या कंपनीतून पैसे आले. हे सरकार खिसेकापू आहे. असा घणाघात त्यांनी आज पत्रकार परिषदेमधून केला आहे.

यावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले कि, ‘किरीट सोमय्या यांच्या विरोधात मी सत्र न्यायालयात अब्रुनुकसानीचा दाव दाखल केला आहे. सोमय्या यांनी दुसरा एक घोटाळा जाहीर केला आहे. हे सर्व कारखाने जुने आहेत. तसेच त्यांनी आज आणखी एक जावई शोध लावला आहे.

मी जावयाशी मिळून १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. मी किरीट सोमय्या यांना आवाहन करेन की माझ्या कुटुंबीयांचे नाव घेणे चांगले होणार नाही. माझा जावई आपापला व्यवसाय करतो. त्यामुळे त्यांनी आमची बदनामी करणे थांबवावे.’ असे स्पष्ट मत यावेळी हसन मुश्रीफ यांनी मांडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!