मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यापासूनच भाजप नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. बुधवारी मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा सुरु झाला आहे.
काही वेळा पूर्वी ‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’ असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राणे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी नारायण राणेंना पहिला बहुमान मिळाला आला. नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र म्हणजेच भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे हे दिल्लीमध्ये उपस्थित आहेत.
नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निलेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी राणे साहेबांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. ज्या ज्या वेळई त्यांच्यावर एखादी जबाबदारी टाकण्यात आली त्यावेळी त्यांनी ती पूर्ण करण्याचं काम केलंय. आज त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याचा आम्हाला आनंद आहे.
दरम्यान, यावेळी शिवसेनेच्या विरोधात राणे यांना प्रमुख अस्त्र म्हणून वापरलं जाईल का ?, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता निलेश राणे म्हणाले कि, ‘केंद्रीय मंत्रिपद ही एक मोठी जबाबदारी आहे. तुम्ही त्याचा राजकीय अर्थ लावत असाल. पण साहेबांन देण्यात आलेली जबाबदारी मोठी आहे. नगरसेवक ते केंद्रीय मंत्री हा प्रवास मोठा आहे, सोपा नक्कीच नाही. हे येड्यागबाळ्याचं काम नाही. उरला प्रश्न शिवसेनेचा तर त्यांना आम्ही किंमत देत नाही. जे मिळालं त्यात आम्ही समाधानी आहोत.’ असे मत निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांनो वेळीच काळजी घ्या; आज नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ
- कोरोनाच्या दोन लाटेमधील काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा – उद्धव ठाकरे
- कोरोना परिस्थिती हाताळण्यात हर्षवर्धन यांना अपयश आल्यानेच त्यांचा राजीनामा घेण्यात आला ?
- मोदींनी मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याने भाजपचा ‘हा’ नेता झाला भावूक , म्हणाला …
- राज्यातील ग्रामीण भागात पुन्हा शाळांची घंटा वाजणार; वर्षा गायकवाड यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
