Share

मोदींनी मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याने भाजपचा ‘हा’ नेता झाला भावूक , म्हणाला …

Published On: 

नवी दिल्ली : आज संध्याकाळी 6 वाजता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. 7 जुलै, म्हणजेच आज मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

त्यापूर्वीच आतापर्यंत 12 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच मोदी मंत्रिमंडळात 43 नव्या मंत्र्ंयांचा समावेश होणार आहे. पण एकामागून एक मंत्री राजीनामे देत असल्याने नव्या विस्तारात कुणाला संधी मिळणार यापेक्षा कोण मंत्री घरी गेलं याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजपाचे पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील आमदार बाबूल सुप्रियो यांचाही राजीनामा घेण्यात आला असून, मंत्रिपद सोडावे लागल्यानंतर भावूक झालेल्या बाबूल सुप्रियो यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. ‘होय, जेव्हा धूर येत असेल तेव्हा कोठेतरी आग पेटली पाहिजे मीडियामध्ये माझे मित्र ज्यांना माझी काळजी आहे त्यांचे फोन कॉल घेण्यास सक्षम नाही म्हणून मला त्यास माझे शब्दलेखन करु द्या ..होय, मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे ( ‘राजीनामा देण्यास सांगितले’ )पंतप्रधानांच्या मंत्री मंडळाचे सदस्य म्हणून माझ्या देशाची सेवा करण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे.

https://www.facebook.com/BabulSupriyoOfficial/posts/4273631919346250

मला अत्यंत आनंद होत आहे की आज मी माझ्यावर भ्रष्टाचाराचे ठसे न घेता, माझ्या सर्व ताकदीने माझ्या मतदार संघाची सेवा केली आणि जेव्हा आसनसोलने पुन्हा एकदा मला खासदार म्हणून परत 2019 मध्ये पुन्हा तिहेरी मार्जिन वाढवून मतदान केले तेव्हा त्यांचा दयाळूपणा उपभोगला, माझ्या सहकार्‍यांना शुभेच्छा.’ अशा आशयाची भावूक पोस्ट त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!