पुणे : पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर दुसऱ्या कोरोना लाटेतील रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु झाली. एप्रिल-मे महिन्यात दिवसाला ७-८ हजारांच्या घरात रुग्णांची संख्या गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी नव्या बाधितांची संख्या गेले काही दिवस वाढत आहे.
कोरोनामुक्ताच्या संख्येपेक्षाही नव्या कोरोना रुग्णांची संख्या हि अधिक असल्याने पुन्हा एकदा सक्रिय रुग्णांची संख्या हि २८०० पार गेलीये. तर, आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत अधिक वाढ झाली असून अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
आज (दि. ०७ जुलै) रोजी पुणे शहरात तब्बल ४३२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८० हजार ५८२ इतकी झाली आहे. शहरातील २७१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६९ हजार ०८३ झाली आहे.
तर, पुणे शहरात सध्या २ हजार ८७१ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २५२ रुग्ण गंभीर तर ४५४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सुपरस्टार दिलीप कुमार अनंतात विलीन ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार
- मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तार यादीत नारायण राणेंच नाव पहिलं; महाराष्ट्रातून ४ मंत्र्यांची वर्णी
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- ‘या’ अभिनेत्रीने केले कॅप्टन अमेरिकाला प्रपोज; पोस्ट व्हायरल


