लातूर : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून परिस्थिती गंभीर बनत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले होते. यामध्ये त्यांनी कोरोना संकटाच्या काळात परिस्थिती हाताळण्यासाठी पाच कलमी कार्यक्रम राबवण्याची सूचना केली आहे. मात्र, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी डॉ. मनमोहन सिंग व काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं होतं.
आता काँग्रेस नेते व आमदार धीरज देशमुख यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून भाजपच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, त्यांनी आकडेवारी सादर करत लसीकरणाबाबत केंद्राने केलेल्या दाव्याला थेट आव्हान देखील दिलं आहे.
धीरज देशमुख यांची फेसबुक पोस्ट –
देशासमोर कुठलीही आपत्ती आल्यावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची नेहमीच राहिली आहे, याच भावनेतून भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे केंद्र सरकारला कोव्हीड च्या संकटातून बाहेर पडण्याच्या दृष्टीने 18 एप्रिल रोजी पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या.
त्या सुचनांबद्दल आभार मानण्याची कृतज्ञता दाखवण्याऐवजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी त्या पत्राचे उत्तर देताना राजकीय शेरेबाजी करत काँग्रेस शासित राज्यांच्या लसीकरण मोहिमेबद्दल टीका केली होती, ही टीका करताना त्यांनी कुठलीही आकडेवारी देण्याचे टाळले असून, कॉंग्रेसशासित राज्यांचा लसीकरणाचा वेग कमी पडत असल्याचा मोघम उल्लेख केला आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र व इतर काँग्रेस शासित राज्यांची बाजू मांडणे मला गरजेचे वाटले.
केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राने राज्याला मिळालेल्या डोसेस पैकी जवळपास 92% डोसेस पात्र नागरिकांना दिले होते, राजस्थान राज्य सरकारने 93 % तर पंजाब राज्य सरकारने मिळालेल्या डोसेस पैकी 89% डोसेस नागरिकांना दिले होते, छत्तीसगड व झारखंड ही देशातील Tribal states म्हणून ओळखली जातात, भौगोलिक कारणांमुळे व आधीपासूनच आरोग्याच्या पायाभूत सुविधा कमी असतानाही छत्तीसगड व झारखंड या दोन ट्रायबल राज्यांनी मिळालेल्या डोसेस पैकी अनुक्रमे 86% व 77% डोसेस आपल्या नागरिकांना दिले आहेत.
https://www.facebook.com/DhirajVilasraoDeshmukh/posts/3873938792683800
विशेष म्हणजे मिळालेल्या डोसेस पैकी नागरिकांना लसीकरण करणाऱ्या राज्यांमध्ये देशात जी 6 राज्ये आघाडीवर आहेत, त्यात एकही राज्य भाजप शासित नाही, हे तरी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. खरंतर ही वेळ राजकीय चिखलफेक करण्याची नाही, मात्र खोटी माहिती प्रसारित होऊन सर्वसामान्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून ही माहिती मला समोर आणावी लागली.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात कडक लॉकडाऊन सुरु ! जाणून घ्या नियमावली
- जिगरबाज! १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे फळ
- ‘त्या रिकाम्या जागेत तू नेहमीच जिवंत राहशील बाळा’, पंकजा मुंडेंच्या पोस्टने सोशल मीडिया गहिवरला
- ‘प्रीतम मुंडेंनी त्यांचा खासदार निधी कोविड सेंटरसाठी वापरावा’, वंचितची मागणी
- ‘भाजप ५० हजार रेमडेसिविर देणारच’, प्रवीण दरेकर भुमिकेवर ठाम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

