मुंबई : महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन राज्यातील नागरिकांना देण्याचे वचन दिले होते. त्यावर पक्ष ठाम आहे. इंजेक्शन आम्ही जनतेला थेट न वाटता ते राज्य सरकारला सुपूर्द करणार आहोत, अशी ग्वाही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले आहे.
वृत्तपत्राशी साधलेल्या संवादात दरेकर म्हणाले की, मी व भाजप आमदार प्रसाद लाड आम्ही दोघांनी दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीला १२ एप्रिल रोजी भेट दिली होती. कंपनीकडे रेमडेसिविरचा साठा असल्याचे कंपनीने आम्हाला सांगितले. पण महाराष्ट्राला हा साठा देण्यासाठी राज्याच्या एफडीएची परवानगी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकासह अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची १५ एप्रिल रोजी भेट घेतली. १६ एप्रिल रोजी एफडीए आयुक्तांनी ब्रुक फार्मा कंपनीला निर्यात साठा महाराष्ट्रात विक्रीची परवानगी दिली. भाजप कंपनीच्या संपर्कात आहे. कंपनीला आणखी काही परवानग्या आवश्यक आहेत. त्या मिळाल्या की ५० हजार रेमडेसिविर आम्ही आणू, असे दरेकर यांनी सांगितले.
कमिशनमुळे राज्य सरकारची रेमडेसिविर खरेदी रखडली आहे, असा आरोप दरेकर यांनी केला. भाजप देणार असलेल्या ५० हजार रेमडेसिविरची किंमत सुमारे ४ कोटी ७५ लाख इतकी होईल. आम्ही रेमडेसिविर नागरिकांना वाटणार नाही. ते राज्य सरकारला देणार आहोत. प्रयत्न केल्यास रेमडेसिविर उपलब्ध होते, हे आम्हाला उद्धव सरकारला दाखवून द्यायचे आहे असे दरेकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- दैव बलवत्तर! ऑक्सिजन संपण्याच्या ३० मिनिटांपूर्वी पोहोचला टँकर; ५०० रुग्ण बचावले
- विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांना क्लीन चिट
- कोहली विजयाचा ‘चौकार’ मारण्यासाठी तयार, संजू सॅमसन थांबवू शकणार?
- राज्य केंद्रापुढे हतबल; हात जोइून विनंती करतो, आता तरी मदत करा – राजेश टोपे
- आम्ही पाया पडायला तयार पण केंद्राने राज्याला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करावा – राजेश टोपे


