मुंबई : बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही मालिकेसाठी रोहित शर्मा दोन्ही संघात कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे. याशिवाय विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह सारखे अनेक वरिष्ठ खेळाडू पहिल्या टी-२० सामन्यात मध्ये खेळणार नाहीत. मात्र हे खेळाडू शेवटच्या २ टी-२० सामन्यांसाठी संघात खेळताना दिसणार आहेत. युवा गोलंदाज अर्शदीप सिंगचा टी-२० सोबत वनडे संघातही समावेश करण्यात आला आहे. तर उमरान मलिकला फक्त टी-२० संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांचा केवळ पहिल्या टी-२० सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
७ जुलैपासून टी-२० आणि एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. ही मालिका १७ जुलैपर्यंत चालणार आहे. याआधी दोन्ही देशांमध्ये एक पूर्वनियोजित कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होत आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तो कसोटी सामन्यात खेळताना दिसणार नाही.
इंग्लंड मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या संघावर नजर टाकली तर वेगवान गोलंदाज उमरान मलिकला तिन्ही टी-२० सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले आहे. मात्र त्याला वनडे संघात स्थान मिळू शकले नाही. उमरानला आता वनडे फॉरमॅटसाठी स्वत:ला तयार करावे लागेल, असे स्पष्टपणे सूचित केले आहे. त्याच वेळी, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान संघाचा भाग होता. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
अर्शदीपला वनडे मालिकेसाठी संधी
अर्शदीप सिंगला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी संघात स्थान मिळाले आहे. मात्र तो शेवटच्या २ सामन्यांसाठी संघाबाहेर असणार आहे. याशिवाय ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी या युवा गोलंदाजाची संघात निवड करण्यात आली आहे. म्हणजेच एकदिवसीय फॉरमॅटसाठी तो निवडकर्त्यांचा पर्याय आहे. दुसरीकडे, संजू सॅमसन आणि ऋतुराज यांची पहिल्या टी-२० साठी निवड झाली आहे. परंतु त्यांना शेवटच्या २ टी-२० साठी संघात स्थान मिळवता आले नाही. म्हणजेच आतापर्यंतच्या कामगिरीने ते निवडकर्त्यांना प्रभावित करू शकलेले नाहीत. त्याचबरोबर दीपक हुडा आणि इशान किशन यांची तिन्ही टी-२० साठी निवड झाली आहे. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेसाठी इशानला संघात स्थान मिळाले आहे.
व्यंकटेश अय्यरलाही संधी मिळाली नाही
हार्दिक पंड्याच्या आगमनानंतर अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. दक्षिण आफ्रिकेशिवाय आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीही त्याची निवड झाली होती. पण त्याला कोणत्याही सामन्यात प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात तो संघात असेल, पण तो शेवटच्या २ सामान्यांसाठी संघामध्ये स्थान मिळवू शकला नाही. व्यंकटेश एकदिवसीय संघाचाही भाग नाही. अशा स्थितीत त्याला इंग्लंड दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळण्याची शक्यताही कमी झाली आहे.
NEWS ???? – #TeamIndia’s squad for T20I & ODI series against England announced.
More details ???? #ENGvIND https://t.co/ii121ge0jY
— BCCI (@BCCI) June 30, 2022
इंग्लंड मालिकेसाठीचा संघ
वनडे मालिकेसाठी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रणंद कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
पहिल्या टी-२० साठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० साठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रविंद्र पटेल. बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि उमरान मलिक.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

