Share

IND vs ENG : ‘‘विराटला फॉर्मात यायचं असेल तर…”, पाकिस्तानच्या मिसबाहनं सांगितला ‘हा’ उपाय!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीपूर्वी (IND vs ENG) भारतीय फलंदाज विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हकने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कोहली कसा फॉर्ममध्ये परत येऊ शकतो, याबाबत मिसबाहने सांगितले. मिसबाहच्या म्हणण्यानुसार, विराट कोहलीने माघारी जाऊन देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे, तरच तो फॉर्ममध्ये येऊ शकेल.

मिसबाह-उल-हकने विराट कोहलीवर प्रतिक्रिया दिली. जर कोहलीने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, तर त्याला हरवलेला वेग पुन्हा मिळेल, असे तो म्हणाला. त्याच्या मते, कोहलीने हे केले तर त्याला पुन्हा एकदा रोखणे अशक्य होईल. मिसबाह म्हणाला, ”विराट कोहलीने जाऊन देशांतर्गत क्रिकेट खेळावे आणि धावा केल्या पाहिजेत. तिथली गोलंदाजी त्या दर्जाची नसली तरी त्याला लयीत येण्यास मदत होईल. एकदा त्याने धावा काढायला सुरुवात केली की मग संघ कोणताही असो, तो सातत्याने धावा करेल.”

विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. नोव्हेंबर २०१९ पासून त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. आयपीएल २०२२ विराट कोहलीसाठी काही खास नव्हते. तीन सामन्यांत तो शून्यावरही बाद झाला. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी लीसेस्टरशायरविरुद्धच्या चार दिवसीय सराव सामन्यात विराट चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने पहिल्या डावात ३३ तर दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!