Share

SL vs AUS : सामन्यादरम्यान श्रीलंकेचा ‘स्टार’ खेळाडू आढळला कोरोना पॉझिटिव्ह!

Published On: 

मुंबई : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया (SL vs AUS) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान श्रीलंकेचा फलंदाज एंजेलो मॅथ्यूज कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याला या सामन्यात खेळणाऱ्या सहकारी खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेटने ही माहिती दिली. उर्वरित सामन्यासाठी त्याच्या जागी खेळण्यासाठी ओशादा फर्नांडोचा संघात समावेश करण्यात आला. २९ जूनपासून गॉल येथे सुरू झालेल्या या कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मॅथ्यूजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३९ धावा केल्या, परंतु खेळाच्या तिसऱ्या दिवशी तो मैदानावर परतला नाही.

“एंजेलो मॅथ्यूजची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. काल त्याची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली होती जी पॉझिटिव्ह आढळली. त्याला अस्वस्थ वाटत होते. मॅथ्यूजला उर्वरित संघापासून वेगळे केले गेले आहे आणि सध्या तो सर्व कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत आहेत”, असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले.

ऑस्ट्रेलिया विजयी

महान ऑफस्पिनर नॅथन लायनच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात (SL vs AUS) श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला. गॉल कसोटीच्या तिसर्‍या दिवशी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या ४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने अवघ्या ४ चेंडूत हे लक्ष्य गाठले. गॉल कसोटीत श्रीलंकेचे दोन्ही फलंदाज दोन्ही डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर नतमस्तक झाले. श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात २१२ धावांवर तर दुसऱ्या डावात केवळ ११० धावांवर गारद झाला होता. श्रीलंकेचे फलंदाज नॅथन लायनसमोर असहाय्य दिसले. लायनने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात चार श्रीलंकेच्या खेळाडूंची शिकार केली.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!