Share

नगरच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणे गांजा व खसखसची शेती करू द्या!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे ज्या प्रकारे व ज्या प्रमाणात नुकसान झाले ते पाहता पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १० हजार रुपये व फळ पिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये ही मदत अत्यल्प आहे.

दिवाळी गोड होणे दूरच, वाया गेलेल्या पिकांचा उत्पादन खर्चही या मदतीतून भरून निघणार नाही, असा आरोप करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावानेच दहा हजार रुपयांचा धनादेश श्रीरामपूर येथील निलेश शेडगे या शेतकऱ्याने प्रशासनाला दिला आहे. हा धनादेश मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात यावा, अशी विनंतीही या शेतकऱ्याने केली आहे. तसेच सरकारने आम्हाला खसखस व गांजा लागवडीची परवानगी दिल्यास भविष्यात शेतकरी कधीही सरकारकडे मदतीची याचना करणार नाही, असेही या शेतकऱ्याने म्हटले आहे.

यंदा परतीच्या पावसाने अहमदनगरला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यातच हेक्टरी दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या घोषणेनंतर विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.

त्यातच श्रीरामपूर येथील शेतकरी निलेश शेडगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी त्यांच्या नावाने दहा हजारांचा धनादेश प्रशासनाला देत अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. दरम्यान, या शेतकऱ्याने कॅनरा बँकेच्या धनादेशासह एक निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यासाठी श्रीरामपूर तालुका प्रशासनला दिले आहे. हे निवेदन व धनादेश नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी तहसीलदारांच्या वतीने स्वीकारले आहे.

सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेली मदत ही तुटपुंजी असून त्यातून शेतकऱ्यांना कोणताही आधार मिळणार नाही. या मदतीचा आपण निषेध करत आहोत. त्यामुळे सरकारला दहा हजार रुपयांचा महसूल दिला. शेतकऱ्यांना जर गांजा आणि खसखस पिकविण्याची परवानगी दिली तर सरकारी मदतीची गरज पडणार नाही. त्यातून ते सक्षम होतील, असे निलेश शेडगे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!