Share

‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकाबाजूला ऑलिम्पिकची तयारी जगभरात जोरदार सुरु आहे. देशातील विविध क्रीडा प्रकारांचे खेळाडू देखील कसून सर्व करत असून यंदा देशासाठी अधिक पदकं आणावीत यासाठी घाम गाळत आहेत. भारतात आधीच विविध क्रीडाप्रकारांसाठी योग्य प्रशिक्षण आणि सोय नसल्याने खेळाडूंना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. आता खेळाडूंसाठी विविध सोयी करण्यासाठी पुढाकार घेतला जात असतानाच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

म्हाळुंगे बालेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारला आहे. पण, या ट्रॅकवरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या गाड्या उभ्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारला गेला आहे. महत्वाचं म्हणजे, खेळाडूंच्या सरावा व्यतिरिक्त इथं पायी चालण्याचीही परवानगी नसते. हे माहीत असून देखील, आलेल्या मंत्र्यांचे दोन मजले चढण्याच श्रम वाचावं आणि आपल्याला शाबासकी मिळावी यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांनी केल्या या करामतीमुळे क्रीडा विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे संताप व्यक्त केला आहे. ‘पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापिठात ५ कोटींच्या आंतरराष्ट्रीय ट्रॅकची ऐशीतैशी करत थेट शरद पवार, क्रीडामंत्री सुनिल केदारे आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या गाड्याच उभ्या केल्याचे धक्कादायक वृत्त आहे. सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण आहे,’ अशी टीका भातखळकरांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!