Share

अन्वय नाईक प्रकरण : आरोपपत्राला आव्हान देण्यास अर्णब गोस्वामींना हायकोर्टाची परवानगी

Published On: 

मुंबई : वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून अर्णब गोस्वामींसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याला तसेच नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्याची मागणी करत अर्णबसह इतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, अलिबाग पोलिसांनी अलिबाग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना दिली. तसेच आरोपपत्राची प्रत मिळण्यासाठी गोस्वामींच्या वकिलांनी अर्ज केल्यास त्याविषयी लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करून प्रत द्यावी, असे निर्देश दंडाधिकारी न्यायालयाला देऊन याविषयीची पुढील सुनावणी ६ जानेवारीला ठेवली.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर बुधवारी यावर ऑनलाईन सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काल ही माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!