ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला आज (गुरूवार) पासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऍडलेडच्या मैदानात होणारी ही टेस्ट मॅच डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ओपनर पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी ठरला आहे. मॅचच्या दुसऱ्याच बॉलला शॉ शून्य रनवर आऊट झाला. गेल्या काही महिन्यांपासून पृथ्वी शॉ फॉर्मसाठी झगडत आहे. आयपीएलमध्येही त्याला खराब कामगिरीमुळे दिल्लीच्या टीमने बाहेर बसवलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही पृथ्वी शॉ अपयशी ठरला.
पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट कोहलीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली ‘पॅटरनिटी’ लीव्हवर जाणार आहे. विराटच्या गैरहजेरीमध्ये अजिंक्य रहाणे उरलेल्या तीन मॅचमध्ये भारताचं नेतृत्व करेल.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करा; न्यायालयाची महत्वपूर्ण सूचना
- स्त्री हट्टापुढे निकच देखील काही चाललं नाही; भरस्त्यात पूर्ण करावी लागली प्रियांकाची इच्छा
- निलेश लंके यांच्या बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुक निर्णयाचे अण्णा हजारेंकडून तोंडभरून कौतुक!
- दूरसंचार विभागाच्या स्पेक्ट्रमच्या लिलावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
- ‘मोदी लोकांना कोविडशी लढण्याची प्रेरणा देतात, पण स्वतःवर येते तेव्हा मैदानातून पळ काढतात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

