Share

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : एक-दोन नव्हे तब्बल चार वेळा होणार JEE Main परीक्षा

Published On: 

नवी दिल्ली : अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परिक्षा JEE नव्या शैक्षणिक धोरणानुसार होणार असून प्रथमच मराठीसह 13 भारतीय भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे.ही परीक्षा आता वर्षातून चार वेळा घेतली जाणार आहे.

दरम्यान, यामुळे आता विद्यार्थ्यांची ही परीक्षा देण्याची संधी एकदा हुकली तरी त्यांना पुन्हा तीन वेळा ही संधी मिळणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधत ही घोषणा केली.फेब्रुवारी, मार्च, एप्रील आणि मे महिन्यात परिक्षा होईल.

विद्यार्थ्याना आपल्या सोयीच्या वेळी परीक्षा देण तसंच पुन्हा परीक्षा देऊन गुण सुधारणं शक्य होईल असं शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी काल दिल्लीत सांगितलं. फेब्रुवारीतली परिक्षा 23 ते 26 या तारखांदरम्यान होणार आहे.

विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या या मुद्द्यावर आज शिक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. मंत्री निशंक म्हणाले, की ९० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचे प्रत्येकी २५ असे ७५ प्रश्न सोडविणे बंधनकारक असेल. या तिन्ही विषयांचे प्रत्येकी ३० – ३० प्रश्न असतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!