Share

‘हा’ खुल्यावर्गावर अन्याय; अनेकदा अपयशी झालेले अधिकारी प्रशासन कसं हाताळणार? आनंद दवेंची टीका

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात सद्या कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा घोळ कायम असतानाच आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती वेळा परीक्षा देता येईल याबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

आता UPSC प्रमाणेच आता राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. या नियमानुसार खुला प्रवर्गातील उमेदवारांना फक्त सहा वेळा तर ओबीसी (OBC) गटातून 9 वेळा आता परीक्षा देता येणार आहे. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना संधीची मर्यादा नसेल.

या निर्णयावर ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी हा भेदभाव असल्याची टीका केली आहे. ‘राज्यघटनेने सर्वांना समानतेचा अधिकार आणि वचन दिलं आहे. असं असताना देखील खुल्या प्रवर्गाला सहा वेळा, ओबीसींना ९ वेळा आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अर्मयादित वेळा परीक्षा देण्याचा नवीन नियम आयोगाने घेतला आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याची फक्त विनंतीच नाही तर तशी कायदेशीर नोटीस देखील पाठवत आहोत.’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘प्रशासन चालवताना योग्य आणि कर्तृत्ववान सरकारी अधिकाऱ्यांची गरज असते. अनेकदा नापास झाल्यानंतर ते पात्र झाले तर ते प्रशासन सांभाळण्यासाठी कितपत योग्य असू शकतात? असा सवाल दवे यांनी उपस्थित केला आहे. हा गंभीर विषय असून राज्य शासनाने याचा पुन्हा विचार करावा. कोणत्याही वर्गास वेगळी सुविधा देण्याच्या विरोधात आम्ही आहोत. खुल्या प्रवर्गाला सुद्धा २ ते ३ वेळाच संधी असावी. यासोबत, अन्य वर्गाला देखील खुल्या वर्गालाप्रमाणेच सुविधा देण्यात यावी. अमर्यादित वेळा परीक्षा देण्याची दिलेली सुविधा ही खुल्या वर्गावर अन्याय आहे. यासोबतच प्रशासन हाताळण्यासाठी देखील चुकीची बाब असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नीट कायदेशीर उत्तर दिलं नाही तर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार’, असल्याची माहिती देत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!