मुंबई : २०२० हे वर्ष संपायला अवघ्या काही तासांचा कालावधी राहिला आहे. हे सरतं वर्ष अनेक संकटांचं ठरलं असतानाच येणारे वर्ष अधिकाधिक चांगलं जावं अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. यंदा नववर्षाच्या निर्बंध आले असून नागरिकांनी सतर्कता बाळगून साधेपणाने सेलिब्रेशन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. तसेच, नव्या कोरोनाचा प्रसार राज्यात होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे. याच रात्रीची संचारबंदी लागू असल्याने रात्री ११ च्या आतच फूड डिलिव्हरी करावी लागणार असं चित्र निर्माण झालं होतं
मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने फूड डिलिव्हरीबाबतचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आज रात्री दीडवाजेपर्यंत फुल डिलिव्हरी करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार )महापालिकेकडे यासंदर्भात मागणी केली होती. काल, याचा निर्णय स्पष्ट न झाल्याने आहारतर्फे साडेनऊ पर्यंतच ऑर्डर घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, आता महापालिकेतर्फे रात्री दीड वाजेपर्यंत फूड डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली आहे.
…मात्र हॉटेल्स, बार आणि रेस्टोरंट्स ११ लाच होणार बंद !
मुंबईसह राज्यातील महापालिकाक्षेत्रांमध्ये रात्री ११ नंतर संचारबंदी लागू आहे. त्यानुसार, आज देखील हे नियम काटेकोरपणे पाळण्यात येणार असून हॉटेल, रेस्टाँरंट आणि बार हे ११ च्या आत बंद करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘गौरी ज्या कारणाने तू हा निर्णय घेतलास त्याला शिक्षा नक्कीच मिळणार, मग ते कोणी रक्ताचं असलं तरीही’…
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्वाचा निर्णय; परीक्षा देण्यासाठीच्या नव्या मर्यादा केल्या जाहीर
- महेबूब शेख यांना नाहक बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र – राष्ट्रवादी
- विरोधी पक्षाने फक्त तंबूत बसून निदर्शने करावीत; शेतकरी नेत्यांची टीका
- तृतीयपंथीयांच्या मनाचा मोठेपणा; साईबाबांच्या झोळीत टाकले 11 लाखांचे दान
- डिसेंबर अगोदरच भारतात आला असू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन – एम्स संचालक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
