मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस’ मराठी ३ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये आता गँगस्टर अरुण गवळी यांचा जावई आणि अभिनेता अक्षय वाघमारे हा पुन्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या त्याची इन्स्टाग्राम पोस्ट ही चर्चेचा विषय ठरत आहेत. यामुळे आता या शोमध्ये कोणतं नवीन वळण येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान अक्षय वाघमारे इन्स्टाग्राम पोस्टवर बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन सुरु आहे. “२ नवीन सदस्य, २ वाईल्ड कार्ड सहभाग, २ आठवड्यात घराबाहेर…” असे शेअर केले आहे. यावर त्याने कॅप्शन लिहिताना म्हणाला की, “वाईल्ड कार्डद्वारे सहभागी झालेले दोन्ही सदस्य २ आठ्वड्यात घराबाहेर पडले. नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्रीपेक्षा घराबाहेर पडलेल्यापैंकी काही सदस्यांना पुन्हा संधी मिळाली तर… काय वाटतं तुम्हाला .. ??’ असा प्रश्न त्याने विचारला आहे. या पोस्टवर भरपूर कमेंट येत असून ‘आम्हाला तुला पुन्हा बिग बॉसच्या घरात बघायला आवडेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी तू आलास तर आवडेल अशी कमेंट केली आहे.
https://www.instagram.com/p/CWSeRv2shaP/?utm_source=ig_web_copy_link
या पोस्टनंतर तो बिग बॉसमध्ये परतणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र तो पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत असून या कार्यक्रमातून अक्षय वाघमारे हा पहिला स्पर्धक बाहेर पडला. तो बाहेर पडल्यामुळे घरातील सदस्यांसोबत त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. त्यानंतर आदिश वैद्य आणि निथा शेट्टी-साळवी वाईल्ड कार्डद्वारे एंट्री केली. मात्र हे दोन्ही सदस्य केवळ दोन आठवड्यातच घराबाहेर पडले. त्यानंतर अक्षयने ही पोस्ट शेअर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य…- शरद पवार
- नवाब मलिक यांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांवर आशिष शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ?; अटके पासून अंतरिम दिलासा नाही
- ‘मोदी सरकार आठ दिवसांत ९५ हजार ८२ कोटींचा निधी राज्यांना देणार’
- घरावरील हल्ल्यानंतर खुर्शीद यांची प्रतिक्रिया; म्हणाले,’हिंदुत्व काय करतं पहायचं असेल तर…’


