औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राज्य पातळीवर यशस्वी झालेला महाविकासआघाडीचा फॉर्मुला वापरणार असा निर्णय घेतला आहे, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांनी घेतला आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार आंबादास दानवे यांनी सांगितले. भाजपच्या सर्व संचालकाना घरी बसवण्यासाठी जिल्हा बँक निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकासआघाडीतील पक्षांनी घेतला आहे असे , आमदार दानवे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका एकत्र लढविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला आहे. औरंगाबाद जिल्हा बँकेवर काँग्रेस पक्षाचे सुरुवातीपासून वर्चस्व राहिले आहे. राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असताना भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनीही बँकेच्या संचालक मंडळात स्थान मिळवले होते. यावेळी बागडेंनी नितीन पाटील यांना भाजपच्या गोटात आणले होते.
येत्या २१ मार्च रोजी जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, असे सांगितले होते. परंतु असे काही होणार नाही, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व संचालकांना घरी बसवण्यासाठी रणनीती आखली आहे, असे आमदार दानवे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक; आरोपीला हिंगोली पोलिसांच्या बेड्या
- राज्यातील २८ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट
- परभणी, हिंगोली जिल्ह्याने चाचण्या वाढवाव्यात; विभागीय आयुक्तांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- टूलकीट प्रकरणा दरम्यान आता ‘गो बॅक मोदी’ ट्विटनं माजवली खळबळ
- अहमदाबादेतील सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज; बीसीसीआयची ट्विट करत माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

