Share

“माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले”

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : राज्यात सध्या नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जोरदार कलगितुरा रंगला आहे. शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात आता खटके उडायला सुरवात झाली आहे.

‘माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. तुम्ही काय महाराष्ट्राला शिकवता?’, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणत होते. मतदारसंघातील रस्त्याबाबत बोलताना त्यांचा रोख एकनाथ खडसे यांच्याकडे होता. गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

माझे 30 वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावे की मी काय विकास केला आहे. हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते मी केले आहेत. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही गुलाबराव पाटलांनी भाष्य केले आहे. मुंडक शिवसेनेचे कंबर भाजपची आणि पाय राष्ट्रवादीचे कुठे चालले आहे हे. यामध्ये बदल व्हायला हवा सर्व एकच असायला हवे. राज्यात पालकमंत्री शिवसेनेचा, नगर विकास मंत्री शिवसेनेचा आमदार शिवसेनेचा असेच व्हायला हवे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!