मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समाजकंटकांनी गुरुवारी(१६ डिसें.) रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे वक्तव्य केले होते.
याला अनुसरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासांदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’कर्नाटक सरकारने कारवाई केलीच आहे जयंतराव, हा शहाणपण जमल्यास स्वपक्षीय राजू नवघरे आणि नवाब मलीकला सांगा.’
कर्नाटक सरकारने कारवाई केलीच आहे जयंतराव, हा शहाणपण जमल्यास स्वपक्षीय राजू नवघरे आणि नवाब मलीकला सांगा pic.twitter.com/1v54guTapm
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 19, 2021
दरम्यान, आज(१९ डिसें.) सकाळी भातखळकरांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता ज्यामध्ये ते म्हणाले की,’कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणारा त्याठिकाणच्या स्थानिक काँग्रेसच्या मुस्लिम आमदाराच्या कार्यकर्त्याला कर्नाटक सरकारने अटक केली. परंतु,या प्रश्नावरून राजकारण करणाऱ्या आणि पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांना माझे दोन खडे सवाल आहेत. ज्या नवाब मलिकला तुम्ही ‘गुड गोइंग’ बोललात त्याच नवाब मलिकने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करायला नकार दिला होता. त्यावेळी तुम्हाला हे आठवलं नाही? काही महिन्यांपूर्वीच ज्यांच्याबरोबर तुम्ही सत्तेत आहात त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांची बूट घालून त्याठिकाणी जाऊन विटंबना केली होती. त्यावेळी आपण मुकगिळून बसलात. आणि आता कर्नाटकातला काँग्रेसच्या आमदाराचा खास मनुष्यही विटंबना करतोय तर आपण सोनिया गांधींनाही पत्र लिहिणार का?’ असा सवालही भातखळकरांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत
- “केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही”
- “छत्रपतींसमोर नतमस्तक न होणाऱ्या मलिकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवताय”
- राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राष्ट्रवादीकडून आज दुग्धाभिषेक
- “मोदींजींनी खरे शिवभक्त असल्याचे संपूर्ण देशाला दाखवून द्यावे, अन्यथा…”


