Share

केएल राहुल आणि राशिद खान लखनऊ संघात होणार सामील!

Published On: 

नवी दिल्ली : आयपीएलच्या आगामी हंगामावर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने तीन प्रमुख खेळाडू कोणत्या संघात जाऊ शकतात याचा अंदाज बांधला आहे. आकाश चोप्राच्या मते, हे तिन्ही दिग्गज खेळाडू ड्राफ्टद्वारे लखनऊ संघात जाऊ शकतात.

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंना त्यांच्या संघाने सोडले आहे. वर्षानुवर्षे त्यांच्या संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या अनेक खेळाडूंना सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये पुढील हंगामात दोन नवे संघ येणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबादचे संघ आता आयपीएलचा भाग असतील तसेच आता आयपीएलमध्ये ८ ऐवजी  एकूण 10 संघ असतील.

लखनऊ आणि अहमदाबादचे संघ ड्राफ्टद्वारे काही खेळाडूंची निवड करू शकतात. लखनऊ संघ केएल राहुल आणि राशिद खान यांना ड्राफ्टद्वारे निवडू शकतो, असे आकाश चोप्राला वाटतोवाटते. याशिवाय इशान किशन आणि हार्दिक पांड्यामधूनही एक खेळाडू निवडला जाऊ शकतो.

केएल राहुलला पंजाब किंग्ज संघाने सोडले आहे. त्याचवेळी रशीद खानलाही सनरायझर्स हैदराबादने सोडले आहे. याशिवाय ईशान किशन आणि हार्दिक पांड्यालाही मुंबई इंडियन्सने सोडले आहे.दरम्यानगौतम गंभीरला लखनऊ संघाचा मार्गदर्शक आणि अँडी फ्लॉवरला प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!