Rohit Pawar | मुंबई : महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी गेले दोन-तीन दिवस झाले अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे. यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतं आहे. त्याचबरोबर अचानक पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचंही खूप मोठ्या प्रमाणावर नुसकान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सत्ताधारी नेत्यांवर चांगलाच हल्ला केला आहे.
काय म्हणाले रोहित पवार (Rohit Pawar)
रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक आकाऊंटवरून एक पोस्ट करत शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती सांगत, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. हे करताना त्यांनी सत्ताधारी नेत्यांचेही कानधरनी केली असल्याचं दिसून येतं आहे.
फेसबुक पोस्ट-
राज्यात आतापर्यंत 123% पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 23 टक्के अधिक आहे. यंदा जुलै सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 25 लाख शेतकऱ्यांना फटका बसला तर आता सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे 45 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा नुकसान झालंय. बहुतांश ठिकाणी तर दोनदा तीनदा नुकसान झाले आहे.एकंदर संपूर्ण हंगामच वाया गेल्याने यंदाची परिस्थिती अतिशय भयान आहे. राज्याच्या सर्वच भागातील शेतकरी पूर्णतः उध्वस्त झालाय.
अशा कठीण प्रसंगी राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. मा. देवेंद्र फडणवीस साहेब (Devendra Fadnavis) , महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब (Radhakrishna Vikhe Patil), चंद्रकांत पाटील दादा (Chandrakant Patil), प्रवीण दरेकर साहेब (Pravin Darekar) आपण सर्वांनी मागील काळात ओला दुष्काळ जाहीर करण्याची केलेली मागणी निश्चितच शेतकरी हिताची होती. आताही तीच भूमिका घेऊन त्वरित ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आपण प्रयत्न कराल ही अपेक्षा.
महत्वाच्या बातम्या :
- Diwali Special Offer | TVS च्या ‘या’ बाईकवर कंपनी देत आहे स्पेशल दिवाळी ऑफर
- Eknath Khadse | रश्मी शुक्लांना दिलासा मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,
- Diwali 2022 | धनत्रयोदशी दिवशी ‘या’ गोष्टी दिसल्या तर तुमच्या घरात येईल लक्ष्मी
- Rashmi Shukla । रश्मी शुक्ला यांना दिलासा! अवैध फोन टॅपिंग प्रकरणात राज्यसरकारचा मोठा निर्णय
- Maharashtra Rain Update | आज राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर उद्यापासून उघडीप होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

