🕒 1 min read
चेन्नई : सध्या भारतात आयपीएलचा ‘रण’संग्राम सुरु आहे. कालपासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली. यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना हा आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. सलामीच्या सामन्यात दोन विकेट्स राखून विजय नोंदवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. सलामीचा सामना जिंकून आरसीबीने चॅम्पियन बनण्याची तयारी दर्शवित आहे.
मात्र, सामना जिंकूनही भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगन यानं विराटच्या एका निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सामन्यानंतर त्यानं सोशल मीडियावर जहरी टीका केली आहे. विराटने संघातील प्रमुख खेळाडू एबी डिव्हिलियर्सला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं. व वॉशिंग्टन आणि रजत यांना त्याच्याआधी संधी दिली. सामना सुरू असताना RCBचे चाहते विराटच्या या निर्णयावर नाराज दिसले. युवीलाही हा निर्णय पटला नाही आणि त्यानं सामन्यानंतर ट्विट केलं. तो म्हणाला,”एबी डिव्हिलियर्सला पाचव्या क्रमांकावर का खेळवलं, हे समजलं नाही. तुमच्या संघातील सर्वोत्तम फलंदाज एक तर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळायला हवा. हे मी माझं मत व्यक्त केलंय.’ असे ट्विट करत युवराजने नाराजी व्यक्त केली आहे.
Don’t understand @ABdeVilliers17 batting at no 5 !!? ????♂️your best batsmen after opening have to come at no 3 or no 4 in t20 just an opinion #MIvRCB #IPL2021
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) April 9, 2021
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना एबी डिव्हिलियर्सने मॅच विनिंग खेळी केली. विराट कोहली (33) आणि ग्लेन मॅक्सवेल (39) धावा केल्या. ही दोघे माघारी परतल्यानंतर मॅच मुंबई इंडियन्सच्या बाजूने झुकली होती. मात्र एबीने 27 चेंडूत केलेल्या 48 धावांच्या जोरावर अखेर बंगळुरुला यश मिळाले.
महत्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान; ३७३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार
- पंत आणि धोनी आमने-सामने ; आज रंगणार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना
- कोरोना कहर! लातूर जिल्ह्यात १४०४ विक्रमी रूग्णसंख्या
- हर्षल पटेलची कमाल कामगिरी ; रोहित शर्माचा 12 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत
- चिंताजनक! लातूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

