Share

लातूर जिल्हा; नागरिकांना घरी बसवण्यासाठी तहसीलदार उतरले रस्त्यावर

Published On: 

लातूर: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, प्रशासन नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना देत असले तरी मात्र नागरिक त्यांना प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या तहसीलदारानी स्वतः रस्त्यावर उतरत नागरिकांवर कारवाई केली. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून एका दिवसात सुमारे २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिरूर अनंतपाळ तहसीलचे तहसीलदार अतुल जटाळे, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व नगरपंचायतीचे कर्मचारी शुक्ररवारी सकाळपासून शहरातील बसवेश्वर चौकात विना मास्क शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ९५ टक्के नागरिकांनी मास्कचा वापर केल्याचे पथकास दिसून आले.

शहरात ९५ टक्के नागरिक मास्कचा वापर करत आहेत व सोशल डिस्टंसचे पालन करीत आहेत. त्या बरोबरच शहरातील केवळ मेडीकल व किराणा दुकाने चालु आहेत. जर कोणी नियमाचे उल्लंगन करीत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिला आहे. त्या बरोबर शनिवार व रविवार हे दोन दिवस शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवावे, आवाहन तहसीलदार अतुल जटाळे यांनी नागरीकांना केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!