🕒 1 min read
चेन्नई : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. गेल्या 24 तासात एक लाखहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांच्यावर गेली असताना कालपासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली. कालचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्समध्ये झाला. कालचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने आपल्या खिशात घातला.
सालाबाद प्रमाणे मुंबई सलामीचा सामना हरला. सलामीच्या सामन्यात दोन विकेट्स राखून विजय नोंदवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा अवघा देश सामना करत असताना देखील हे सामने होत असल्याने विशेष काळजी घेतली जात आहे. मात्र हा सामना सुरु असताना गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचे काही फोटोज सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोज मध्ये जय शाह हे विनामास्क सामना पाहत असल्याचे दिसून येत असल्याने आता त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नेटकरी करत आहेत.
https://twitter.com/DineshKumarDU/status/1380546575089340416?s=20
जय शाह यांच्या सोबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि इतर काही अधिकारी देखील काही फोटोजमध्ये विनामास्क दिसत असल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी अत्यंत कडक नियम घालून देण्यात आले आहेत. खेळाडू आणि स्टाफ यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही या साठी विशेष काळजी घेतली जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला शाह यांच्यासह आणखी काही मंडळी मैदानावर विनामास्क दिसून आल्याने नेटकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.
Please take stricter action on everyone on the pictures not wearing the #mask!!@AmitShah @AmitShahOffice @SGanguly99 @JayShah @BCCI pic.twitter.com/VjrnutcMwt
— Rajesh Das (Rajesh Kabir) ???????? (@starchangemaker) April 9, 2021
दरम्यान, गेल्या 24 तासात देशात 1 लाख 45 हजार 384 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 32 लाख 5 हजार 926 वर पोहोचली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाख 46 हजार 631 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 कोटी 19 लाख 90 हजार 859 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत 98 लाख 75 हजार 160 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला’
- आम्ही आतंकवादी नाही, आमचा हक्क मागायला आलोय – निलेश राणे
- कोरोना निर्बंध आणखी कडक करण्याची तयारी, सर्वपक्षीय बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष
- हर्षल पटेलची कमाल कामगिरी ; रोहित शर्माचा 12 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत
- मॅक्सवेलचा तुफान षटकार पाहून कोहली हैराण : पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

