Share

सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यात हे सरकार कुचकामी ठरलं : उपाध्ये

Published On: 

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मुंबईत आझाद मैदानात मराठा विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे नुकत्याच झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाष्य करत भाजपवर तोफ डागली होती. अनेक नेत्यांकडून सरकार गंभीर नाही, सरकारमध्ये समन्वय नाही, अशी धादांत खोटी माहिती देऊन राजकारण केले जाते आहे. हा कायदा पारित करताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही न्यायालयात टिकेल, असा ‘फुलप्रुफ’ कायदा करीत असल्याचे सांगितले होते. मग त्या कायद्याला भाजप सरकारनेच नेमलेल्या वकिलांच्या युक्तिवादानंतरही अंतरिम स्थगिती मिळत असेल तर आम्ही त्याची जबाबदारी फडणवीसांवर ढकलून मोकळे व्हायचे का? असा सवालही अशोक चव्हाण यांनी केला होता.

अशोक चव्हाणांच्या या टीकेसंदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाविकास आघाडी सरकार आरक्षणाबाबत अपयशी ठरल्याचं वारंवार दिसून आलं आहे. फडणवीस सरकार सत्तेत असताना सर्वांशी संवाद साधून विचारपूर्वक कायदा केला होता. तो उच्च न्यायालयातसुद्धा टिकवला, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं.

तर, ‘हे सरकार सत्तेत आल्यानंतर या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात सरकारला टिकवता आले नाहीत. वकील सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत असं देखील ऐकण्यात आलं. फडणवीस सरकारने फुलप्रूफ कायदा केला म्हणून तो उच्च न्यायालयात टिकला. मात्र, सर्वोच्च न्यायालयात त्याची योग्य मांडणी करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यासह सरकारवर होती. ही जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरले आहेत,’ अशी टीका करून केशव उपाध्ये यांनी अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!