🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन काल संपुष्टात आलं. या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. विरोधकांनी हे अधिवेशन सुरु होण्याआधीच सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी सरकार जोरदार हल्लाबोल केला. मेट्रो कारशेड, आरे, सारथी, मराठा आरक्षण, अभिनेत्री कंगना रानौत, पत्रकार अर्णब गोस्वामी यांची अटक यासह अनेक मुद्द्यांवरून सरकारच्या कारभारावर टीकास्त्र या नेत्यांनी सोडलेलं दिसलं.
यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विरोधकांच्या टीकांवर उत्तर दिलं. यावेळी या दोन्ही मंत्र्यांनी तुफान फटकेबाजी केल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नांना चोख उत्तर दिलं.
ठाकरेंनी आपल्या समारोपाच्या भाषणात फडणवीसांना खोचक टोला लगावला. ‘देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जावेत, अशी सर्वांची इच्छा आहे. सुधीर मुनगंटीवार यांची तर अशी इच्छा आहेच आहे,’ असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी अंतर्गत भांडणांमुळे पडणार अशी टीका करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये राज्याच्या नेतृत्वावरून अंर्तगत चुरस निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंच्या या टिपणीवर ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया देताना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शाब्दिक कोट्या करून टाळ्या मिळवणं इतकंच ठाकरेंच्या भाषणाचं सार’ असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- मला आपलेपण राष्ट्रवादीत मिळालं आहे त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करतोय : राजीव आवळे
- प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभागृहात घोषणा
- पवार साहेबांप्रमाणे प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही – अजित पवार
- अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय माणूस आजपर्यंत पाहिला नाही- विनायक मेटे
- दिल्लीच्या सीमेवरुन आंदोलकांना हटविण्याच्या याचिकेवर आज होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
