मुंबई : अभिनेत्री कंगना रनोतने बीएमसीकडून आपल्याविरुद्ध झालेल्या कारवाईच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर जस्टिस एसजे कैथावाला आणि आरआय छागला यांच्या बेंचने हा निकाल दिला.बीएमसीने 9 सप्टेंबर रोजी कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्यावर अवैध निर्माणची नोटिस बजावून कारवाई केली होती. या नंतर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, नेते आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध सरकारी अधिकाऱ्यांवर उलट सुलट विधाने करणे कंगनाच्या या वृत्तीवरून महाराष्ट्रात तिच्यावर भरपूर टीका झाली होती.
यावेळी इंडिया इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) च्या डॉक्टरांच्या एका पॅनलने बहुप्रतीक्षित सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील अहवाल सादर केला होता . या अहवालानुसार, सुशांत सिंह राजपूत याची हत्या झालेली नाही तर ती आत्महत्याच असल्याचं म्हटलं आहे. यावर अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करून कंगनाला सुनावले होते.
कंगनाने एका चॅनेलला मुलाखत देताना बोलली होती कि सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या केली गेली आहे. आणि जर मी हे सिद्ध करू शकले नाही तर मी माझे सगळे पुरस्कार परत करेन, यावर स्वराने ट्विट केले आणि म्हणाली कि “सुशांतची हत्या नसून अत्महत्या आहे, हे आता सिबीआय ने सुद्धा सांगितले आहे.”
यावर कंगनाने सुद्धा ट्विट करत म्हणाली कि “माझी मुलाखत विसरला असाल तर परत बघा मी खोटे आरोप करत असेल तर सरकारकडून मिळविलेले पुरस्कार मी परत करेन हे एका क्षत्रिय कन्याचे वचनआहे, मी राम भक्त आहे. प्राण जाईल पण वचन नाही ‘जय श्री राम’.
त्यानंतर आता पुन्हा एकदा स्वराने एका मुलाखती दरम्यान कंगनावर निशाना साधला आहे. यावेळी ती कांगणाच उदाहरण देत म्हणाली की, एक चांगला कलाकार एक चांगला माणूस असेलच अस नाही. या आधी देखील कांगणाच्या शेतकरी आंदोलना वरील वक्तव्या वरून निषेध व्यक्त केला होता.
यावेळी स्वराने याच स्टेटमेंट वरून नाही तर आपल्यात या आधी ही अनेकदा वाद झाल्याचे सांगितले. तर आपण पडद्यावर चांगल्या भूमिका निभावलेल्या कलाकार खर्या आयुष्यात देखील चांगले असतील असं नाही असं टोला कांगणाला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘गोड बातमी’ मिळण्याची शक्यता
- प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभागृहात घोषणा
- पवार साहेबांप्रमाणे प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही – अजित पवार
- अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय माणूस आजपर्यंत पाहिला नाही- विनायक मेटे
- दिल्लीच्या सीमेवरुन आंदोलकांना हटविण्याच्या याचिकेवर आज होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

