रत्नागिरी : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन काल संपुष्टात आलं. या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. विरोधकांनी हे अधिवेशन सुरु होण्याआधीच सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. काल देखील भाजप नेत्यांनी सरकारवर आरोपांची सरबत्ती केली.
तर, जनतेच्या प्रश्नासाठी २ दिवसांचं अधिवेशन पुरेसं नाही त्यामुळे हे या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी केली जात होती. यावर खुद्द विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील अधिवेशन कालावधीवर नाराजी व्यक्त केली होती. दोन दिवसांचं हिवाळी अधिवेशन काल समाप्त होण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समारोपाचं भाषण केलं. या भाषणावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला.
उद्धव ठाकरेंच्या या भाषणावर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण नेहमीप्रमाणे तेच तेच, दोन तीन शब्द इकडे तिकडे, फोडणी नसलेलं बेचव भाषण. सभागृह जास्त दिवस चालवायची हिम्मत नसलेले उद्धव ठाकरे पाहिले मुख्यमंत्री असतील. खरं कौशल्य सभागृहात दाखवायचं असतं पण ते उद्धव ठाकरेंना कधी जमणार नाही कारण ते डरपोक आहेत.’ अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी ट्विटवरून केली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण नेहमीप्रमाणे तेच तेच, दोन तीन शब्द इकडे तिकडे, फोडणी नसलेलं बेचव भाषण. सभागृह ज्यास्त दिवस चालवायची हिम्मत नसलेले उद्धव ठाकरे पाहिले मुख्यमंत्री असतील. खरं कौशल्य सभागृहात दाखवायचं अस्त पण ते उद्धव ठाकरेंना कधी जमणार नाही कारण ते डरपोक आहेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 16, 2020
महत्वाच्या बातम्या
- शाब्दिक कोट्या करून टाळ्या मिळवणं इतकंच ठाकरेंच्या भाषणाचं सार – भाजप
- ‘चांगला कलाकार, चांगला माणूस असेलच अस नाही.’ कंगना – स्वरामध्ये पुन्हा रंगल वाकयुद्ध !
- कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करणारी महाराष्ट्रातील ‘ही’ ग्रामपंचायत ठरली देशातील पहिली ग्रामपंचायत
- अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय माणूस आजपर्यंत पाहिला नाही- विनायक मेटे
- राज्य सरकारने घेतलेल्या आवश्यक खबरदारीमुळे कोरोनाची साथ नियंत्रणात आली – अजित पवार


