टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचाही समावेश आहे. या यात्रेतील पाथरी येथील सभेत अजित पवारांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढवला आहे.
शिवस्वराज्य यात्रेच्या पाथरी येथील सभेत बोलताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी ‘आज राज्यात सर्वाधिक अन्याय हा मराठवाड्यावर होत आहे. मराठवाड्यासाठी हे सरकार काहीच करत नाही. शिवाय, निवडणुकीच्या तोंडावर गाजरं दाखवण्याचं काम या सरकारनं केलंय. अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे असं विधान केले.
तसेच पुढे बोलताना पवार यांनी ‘कापूस-सोयाबीन-तूर अशा अनेक धान्यांचा हमीभाव मिळालेला नाही. तर आजही तरुणांच्या हाती रोजगार उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत हे सरकार सामान्य जनतेवर अन्याय करत आहे असं विधान केले. त्याच बरोबर बाबाजानी दुर्रानी यांची स्तुती करताना पवार यांनी ‘दुर्रानी यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला पुढे आणण्याचे काम केले, शेतकरी, हमाल, व्यापारी यांना बाबाजानींच्या पुढाकाराने मोठा दिलासा मिळाला असं विधान केले.
दरम्यान, पुढे बोलताना ‘पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही पुढे जाण्याची संधी पवारसाहेबांमुळे मिळाली. शासकीय आणि खासगी क्षेत्रात महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र या युती सरकारच्या काळात महिला अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, गुन्हेगारांवर कुठलाच अंकुश राहिलेला नाही, असा आरोपही अजित पवार यांनी सरकारवर केला.
- राज्य कंगाल करणाऱ्यांना बाजुला केले तरचं चांगले दिवस येतील : अजित पवार
- …तोपर्यंत मोदींना हरवणे शक्य नाही, कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याचे विधान
- #पक्षांतर : उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटील म्हणतात…
- राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

