Share

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तब्बल ९ तास राज ठाकरे यांची बंद दाराआड ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी झाली. त्यानंतर रात्री ८ वाजता राज ठाकरे इडीच्या कार्यालयातून बाहेर पडले.

राज ठाकरेंच्या या चौकशीला भाजपला जबाबदार धरले जात आहे. राज ठाकरे यांनी भाजपविरुद्ध लोकसभा निवडणुकीत केलेल्या प्रचाराचा सरकारकडून ठाकरेंवर सूड उगवला जातोय अशी टीका विरोधकांकडून होत आहे. तसेच मनसेकडूनही वारंवार राज ठाकरे यांच्या चौकशीतून काहीच समोर येणार नाही असं सांगण्यात येत आहे.

या सर्व प्रकरणावरून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘विरोधकांना काय म्हणायचंय ते म्हणू द्या, कारवाई मात्र कायद्यानेचं होणार’ असं विधान केले आहे. त्यामुळे सरकार या प्रकरणात कुठलाही हस्तक्षेप करणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनीही याविषयी भाष्य केले आहे.

फडणवीस यांनी ‘ज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं आहे. ज्यांच्या नेतृत्वाला कोणीही समर्थन द्यायला तयार नाही. त्यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करुन आम्हाला कोणता लाभ आहे. मी प्रॅक्टिकल विषय सांगतो. म्हणजे आम्ही लाभ असला, तरी करणार नाही. पण सांगा आम्हाला काय लाभ आहे? असा सवाल उपस्थित केला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!