Share

राज्य कंगाल करणाऱ्यांना बाजुला केले तरचं चांगले दिवस येतील : अजित पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त भोकरदन येथील सभेत अजित पवार यांनी ‘राज्य कंगाल करणाऱ्यांना बाजुला केले तरच चांगले दिवस राज्याला येतील त्यामुळे आघाडीचे सरकार सत्तेवर आणल्याशिवाय गप्प बसू नका असे आवाहन केले.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी ‘महाराष्ट्रातील सरकारमध्ये शेतकर्‍यांचे प्रतिनिधीत्व करणारं कोण दिसतं नाही. धनंजय मुंडे यांनी २२ मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी उघड केले परंतु त्या सर्वांना क्लीनचीट देण्यात आली फक्त एकनाथ खडसे वगळता असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.

तसेच मनसेचे नेते राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढली आहे. हे कोणत्या प्रकारचे राजकारण सुरु आहे. जो विरोधात बोलतो त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय असेही अजित पवार म्हणाले. तसेच सयाजी शिंदे यांनी सरकारवर वृक्ष लागवडीबाबत गंभीर आरोप केल्याचे सांगत हे सरकार कसे फसवणूक करत आहे हे यावरुन लक्षात घेऊन काम करा असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना एकदा फसलात आता पुन्हा फसू नका असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले. तसेच आमच्या विचाराचं सरकार दिलात तर स्थानिकांना ७५ टक्के रोजगार मिळवून देण्यासाठी कायदा करु असे आश्वासनही पवार यांनी दिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!