Share

#पक्षांतर : उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटील म्हणतात…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष बदलाचे वारे जोरात वाढत आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. यामध्ये छत्रपतींच्या घराण्यातील वारसदारांना आपल्याकडे घेण्याचा सपाटा भाजपने चालवला आहे. मागील आठवड्यात शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी ‘उदयन राजेंच्या भाजप प्रवेशाबद्दल मला काहीच माहित नाही तसेच जर याविषयी तुम्हला काही माहित असेल तर मला सांगा असा प्रतिप्रश्न चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांना विचारला. त्यामुळे या विषयावर भाष्य करून चंद्रकांत पाटलांनी या विषयातून अंग काढून घेतले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती या भेटीत त्यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती संदर्भात ही भेट घेण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली भागातील नागरिकांना लवकरात लवकर त्या ठिकाणचे पंचनामे करून भरपाई मिळावी. याचप्रमाणे लोकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती त्यामुळे तेव्हापासून उदयनराजेंच्या प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत पक्षांतर केले आहे. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. राष्ट्रवादीतून आतापर्यंत वैभव पिचड, चित्रा वाघ, रश्मी बागल, रणजितसिंह मोहिते यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!