मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. दरम्यान, राज्यासमोरील भीषण समस्यांवर उत्तरे शोधण्यात या सरकारला जराही रस नाही, अशी खोचक टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’मविआ सरकारचा अधिवेशनातील रस हा ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करुन घेणे,१९ विधेयके संमत करून घेणे आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक नियम डावलून आवाजी मतदान पद्धतीने घेणे यापुरताच आहे’, असे पाटील म्हणाले आहेत.
राज्यसमोरील भीषण समस्यांवर उत्तरे शोधण्यात या सरकारला जराही रस नाही. pic.twitter.com/bgX2LAqBad
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 24, 2021
दरम्यान, अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधक मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक सल्ले देत आहेत. या मुद्द्यावरुन भापने सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने या टीकेला सुरूवात झाली असून त्यानंतर प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर अशा अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- “तेव्हा बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस सभागृहात मोदींची नक्कल होताच….”; रुपाली पाटलांची टीका
- “मी म्याव म्याव केलं कारण…”; नितेश राणेंचं स्पष्टीकरण
- सत्तेचा माज चढणे म्हणजे काय हे शिवसेनेकडून शिकावं- अतुल भातखळकर
- “…यावरून राज्यकारभाराचा काय बट्ट्याबोळ झाला आहे याची कल्पना यावी”


