मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्युझीलंड संघाचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावात ६४ धावांची मजल मारली आहे.
भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी इंग्लंड दौरा हा अखेरची संधी असु शकते. मागील दोन वर्षात २०१९ पासुन पुजाराने एकही शतक झळकावता आले नाही. यादरम्यान पुजाराने १७ कसोटी सामन्यात २९.२१च्या सरासरीने ८१८ धावा केल्या आहेत. यात २८ डावात त्याला केवळ ९ वेळा अर्धशतक करण्यात यश आले आहे. तर इंग्लंडमध्ये आतापर्यंत पुजाराने ९ कसोटी सामन्यात ५०० धावा केल्या आहेत. आगामी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत जर त्याची कामीगीरी अशीच राहिली तर तो संघातील स्थान गमावू शकतो.
पाचव्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी खेळपट्टीवर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे खेळत होते. या सामन्याच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने ५४ चेंडुत केवळ ८ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने एकही धाव घेतली नव्हती. त्याने २ चौकाराच्या मदतीने ८ धावा केल्या होत्या. तर पहिली धाव घेण्यासाठी त्याने तब्बल ३६ चेंडु घेतले. २०१० मध्ये चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विधानभवनात प्रवेशाकरिता RT-PCR चाचणी सक्तीची तर मंत्र्यांबरोबर एका अधिकाऱ्यालाच प्रवेश
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

