मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात काल विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पुढील महिन्यात म्हणजे ५ आणि ६ जुलै रोजी असं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी 5 व 6 जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
तसेच, तसेच गर्दी होवू नये यासाठी विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षा रक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूमध्ये करण्यात येणार आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. तसेच अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी वगळण्यात आल्या आहेत.
एकाबाजूला राज्यात चक्रीवादळग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा आहे, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना काळातील भ्रष्टाचार, आशा वर्कर्स, धनगर आरक्षण, प्रलंबित नियुक्त्या, एमपीएससी परीक्षा, कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या आकड्यांची लपवाछपवी, परिचारिकांसह कोरोना योद्ध्यांचे मानधन, कायदा सुव्यवस्था अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा आणि सरकारने उत्तर देणं अपेक्षित असताना कोरोनाचं कारण देत अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मराठा आरक्षणाचा अद्याप तिढा सुटलेला नाही. याबाबत पावसाळी अधिवेशनात देखील चर्चा होऊ नये, याकरता कोरोनाचे कारण देत राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने दोन दिवसाचे अधिवेशन ठेवले असल्याचा देखील आरोप केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली


