मुंबई : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार होता. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला आहे. तर, दिग्गज मंत्र्यांकडून कार्यभार काढून घेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. यात, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह मंत्री प्रकाश जावडेकर यांचा देखील समावेश आहे.
आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याने कोरोना काळात परिस्थिती हाताळण्यास ते अपयशी ठरल्याची टीका काँग्रेसने केली आहे. यासोबतच, कोरोनामुळे देशात लाखो लोकांचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंब उध्वस्त झाले असून याला मोदी सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
‘डॉ हर्षवर्धन यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आल्याने कोरोना हाताळण्यात आलेले अपयश व लाखो लोक मरण पावले, अनेकांचे संसार उद्धवस्त केल्याला जबाबदार असल्याची कबुली मोदी सरकारने दिली आहे. असो, मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातून मविआ सरकार आधी होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले आहे,’ असं टीकास्त्र सोडत सचिन सावंत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; जावयाच्या अटकेनंतर ईडीने बोलावणं धाडलं !
- ‘राणे साहेबांचे महत्व काँग्रेसला 10 वर्षात कळाले नाही ते भाजपने 2 वर्षात जाणलं’
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदोन्नती करणार, शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
