Share

‘राणे साहेबांचे महत्व काँग्रेसला 10 वर्षात कळाले नाही ते भाजपने 2 वर्षात जाणलं’

Published On: 

मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यापासूनच नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. काही वेळा पूर्वी ‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’ असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राणे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.

या शपथविधी सोहळ्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी नारायण राणेंना पहिला बहुमान मिळाला आला. नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र म्हणजेच भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे हे दिल्लीमध्ये उपस्थित आहेत. नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह राज्यातील आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. राणे कुटुंबासाठी हा मोठा आणि महत्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याचा राणे यांचा अभ्यास पक्षासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. भारतीय जनता पक्ष पुढील प्रत्येक निवडणुकीत एक नंबरचा पक्ष ठेवण्यासाठी राणे साहेब नक्कीच प्रयत्न करतील.

ते महाराष्ट्रातील आजचे दोन तीन नंबरचे सर्वात अनुभवी नेते आहेत. काँग्रेसला 10 वर्षात कळालं नाही. पण भाजपने राणे साहेबांचं महत्वं 2 वर्षात जाणलं. भाजपने मला आमदार केलं. निलेश राणे यांना प्रदेश भाजपात स्थान दिलं,’ अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!