औरंगाबाद : शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी आदर्श शिक्षक समितीला दिली असल्याची माहिती संघटनने दिली.
आदर्श शिक्षक समितीच्या वतीने बुधवारी शिक्षण अधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटना पदाधिकारींनी शैक्षणिक प्रश्नविषयी त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ५० टक्केहुन अधिक शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून संघटनांनी मागणी करूनही पदोन्नतीचे पदे भरण्यात आली नाही. याबाबत आदर्श शिक्षक समितीच्या वतीने पदोन्नती करावी म्हणून मागणी करण्यात आली. अनेक पदोन्नती पात्र असलेले लोक सेवा निवृत्त झाले परंतु, त्यांना न्याय मिळाला नाही अशी खंत समितीने व्यक्त केली.
या मागणीची दखल घेत शिक्षणाधिकारींनी तात्काळ दूरध्वनीवरून जालना, नांदेड विविध जिल्ह्यातील माहिती घेतली. पदोन्नतीबाबत लवकरच प्रक्रिया सुरू करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी आदर्श शिक्षक समिती पदाधिकारींना दिले असल्याचे दिलीप ढाकणे यांनी कळविल आहे.
महत्वाच्या बातम्या
- हटके अंदाजात सेहवागने धोनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- इंग्लंडच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी राशिद खानची अफगाणिस्ताच्या कर्णधारपदी निवड
- श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुन्हा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; चक्क क्रीडा मंत्र्याला लाच देण्याचा प्रयत्न
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ दोन केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

