मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यापासूनच भाजप नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. बुधवारी मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा सुरु झाला आहे.
काही वेळा पूर्वी ‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’ असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राणे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी नारायण राणेंना पहिला बहुमान मिळाला आला.
नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री पदी वर्णी लागली असून त्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांभाळलेलं खातं मिळणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. युतीचं सरकार असताना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री पद शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याकडे होते ते रिक्त असून नारायण राणे यांना मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात व्यापक फेरबदल करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सुपरस्टार दिलीप कुमार अनंतात विलीन ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार
- मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तार यादीत नारायण राणेंच नाव पहिलं; महाराष्ट्रातून ४ मंत्र्यांची वर्णी
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- ‘या’ दिवशी होणार अजय देवगनचा ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ प्रदर्शीत
- ‘या’ अभिनेत्रीने केले कॅप्टन अमेरिकाला प्रपोज; पोस्ट व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
