Share

मोठी बातमी : एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; जावयाच्या अटकेनंतर ईडीने बोलावणं धाडलं !

Published On: 

मुंबई : ईडीने भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळं हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना मोठा दणका दिला आहे. एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावाई गिरीश चौधरी हे सध्या ईडीच्या अटकेत आहेत.

पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर आज सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.

न्यायालयाने चौधरी यांना १२ जुलै ईडी कोठडी सुनावली असून खडसेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अशातच, ईडीने खडसेंना समन्स बजावला आहे. उद्या सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीने एकनाथ खडसे यांना समन्स बजावला आहे. दरम्यान, याआधीच्या समन्सला खडसेंनी कोरोना व प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत दांडी मारली होती. यामुळे खडसे उद्या हजर राहणार की नाही हे महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!