औरंंगाबाद : पुष्पनगरी परिसरात राहणाऱ्या डॉक्टरच्या बंगल्यात शिरलेल्या तीन चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) मध्यरात्री घडली. यावेळी डॉक्टरने चोरट्यांना हटकले तरी चोरट्यांनी डॉक्टरला न जुमानता चंदनाचे झाड कापून नेले.
चोरट्यांचा हा सर्व कारनाम्याची व्हिडीओ शुटींग डॉक्टरने आपल्या मोबाईलमध्ये केली आहे.
पुष्पगनगरी परिसरात डॉ.विवेक घारापुरे यांचा बंगला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास डॉ.घारापुरे यांच्या बंगल्याच्या आवारात तीन चोरटे दाखल झाले. यावेळी झालेल्या आवाजामुळे डॉक्टर घारापुरे हे जागे झाले.
त्यांनी हातात बॅटरी घेवून बंगल्याची पाहणी केली असता तीन चोरटे चंदनाचे झाड कापत असल्याचे त्यांना दिसले. डॉ.घारापुरे यांनी चोरट्यांच्या दिशेने बॅटरीचा उजेड करून आरडा-ओरड केली तरी चोरट्यांनी निर्धास्तपणे चंदनाचे झाड कापून चोरून नेले. दरम्यान, डॉ.घारापुरे यांनी चोरट्यांचा हा सर्व कारनाम्याची व्हिडीओ शुटींग केली. सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यावर गुन्हेशाखा पोलिसांसह क्रांतीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’


