औरंगाबाद : धावणी मोहल्यात राहणाऱ्या वृद्ध दांपत्याच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. घरातील लोखंडी कपाट तोडून त्यात ठेवलेले, तब्बल २८ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. हि घटना दि. ९ रोजी उघडकीस आली. कडक निर्बंध असल्यामुळे मागील काही महिन्यापासून दोघे देवानगरी भागात राहणाऱ्या मुलाकडे वास्तव्यास होते.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मार्च महिन्यात लागू झालेल्या कडक निर्बंधामुळे जनार्दन अवस्थी आणि त्यांच्या पत्नी तेंव्हापासून देवानगरीत त्यांच्या मुलाकडे वास्तव्यास होत्या. त्यांनी त्यांचे मौल्यवान दागिने सोबत न नेता, धावणी मोहल्यातील घरात असलेल्या कपाटात ठेवलेले होते. ते दोघे घरात नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाट फोडत २८ तोळे सोन्यावर डल्ला मारला. मात्र, इतर ठिकाणी ठेवलेले दागिने जशाश तसे होते.
कडक निर्बंध शिथिल होताच अवस्थी दांपत्य पुन्हा धावणी मोहल्यात असलेल्या घरी राहण्यासाठी आले. दि. ९ रोजी खोलीसह कपाटाची पाहणी करत असताना. हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी हि माहिती त्यांचा मुलगा सचिन आणि सून विजया यांना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी विजया अवस्थी यांच्या फिर्यादी वरून सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …अन्यथा निर्बंध पुन्हा नव्याने लावावे लागतील ; वडेट्टीवारांचा इशारा
- शिवसेनेची विचारधाराच चंचल झालीये; दरेकरांची टीका
- स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका योग्यच, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे पटोलेंना समर्थन !
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

