औरंगाबाद : गारखेडा परिसरातील रेणूकानगर येथे असलेल्या एका घराचे व दुकानाचे कुलूप तोडून चोरटयाने दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेले १ लाख २० हजार रोख रक्कमेसह दोन खाद्य तेलाचे डब्बे, एक बिस्कीटचे पाकीट, कॅडबरी चॉकलेट, साबणाचा एक बॉक्स असा एकुण दिड लाखांचा माल चोरून नेला.
ही चोरी २० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. किराणा दुकानदार सुरेश नानासाहेब सोळंके (रा. जय अंबीका शाळेच्या जवळ, रेणुकानगर, गारखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात किराणा दुकाना फोडण्याचे सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे नाका बंदीवर व्यस्त पोलिसांच्या नजरेआड चोरटे मोठ्या प्रमाणात चोऱ्याकरीत आहे. यांचा लवकरात लवकर पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
- वरुडी येथे भरधाव जीप घुसली थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये; ३ पोलीस जखमी
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला डॉक्टरांना ‘हा’ खास सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

