Share

गरीब मजुरांच्या पैश्यावर चोरट्यांचा डल्ला

Published On: 

औरंंगाबाद : पडेगाव परिसरातील एका कुलरच्या कारखान्यात काम करणा-या गरीब मजूरांचे जवळपास ४० हजार रूपये आणि त्यांचे कपडे ठेवलेल्या बॅगा चोरट्याने चोरून नेल्या. ही घटना ६ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

अतिक रफीक खान (वय २४, रा.कानीवळा, मध्यप्रदेश, ह.मु.कासंबरी दर्गाहजवळ, पडेगाव) हे आपल्या सहकार्यांसोबत एका कुलर बनविणा-या कारखान्यात काम करतात. दोन दिवसापुर्वी सर्व कामगारांच्या पगार झाल्याने कामगारांनी त्यांना मिळालेले वेतनाचे पैसे आपल्याजवळील कापडी बॅगमध्ये ठेवून सर्वजण झोपी गेले होते.

मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या खोलिचा दरवाजा उघडून कामगारांच्या बॅगा व रोख रक्कम ४० हजार रूपये चोरून नेले. याप्रकरणी अतिक रफीक खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!