🕒 1 min read
मुंबई : एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
मलाड पूर्वमध्ये भाजपा दिंडोशी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतांना सोमय्या म्हणाले की,’समीर तु दलित नाही, तु मुस्लीम आहे. क्रांती रेडकर तुझा नवरा मुस्लीम आहे. त्याचं पहिलं लग्न नाही निकाह झाला होता. ‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है’, त्यांचा बाप नाही, ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवार यांना विचारा १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? दाऊदसोबत कोण बसलं होतं हे शरद पवार विसरले का? ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे. दाऊदचा संबंध कुणाशी आहे, दाऊद कुणाचा बाप आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलंय.’
दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र करणार अशी शपथ घेतली होती वाटतं. जिथं पाहा तिथं घोटाळे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भलेही महाराष्ट्राला भ्रष्ट्राचारयुक्त केलं असेल, पण आम्ही त्यांचं आव्हान स्विकारत महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करू. ठाकरे-पवारांनी मराठी माणसाच्या अस्मितेचं नाव घेत हे महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केलं आहे’, असा आरोपही यावेळी सोमय्या यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एमआयएम महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढणार’, असदुद्दीन ओवेसींची घोषणा
- पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस भेटीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- शरद पवारांबद्दल अपशब्द वापरल्याने तुषार भोसलेंविरोधात सहा तक्रारी दाखल
- ‘परमबीर सिंह बेल्जियममध्ये कसे गेले?’ संजय निरुपमांचा सवाल
- चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत, ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे- धनंजय मुंडे


