मुंबई : ‘राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असं काहीही मी बोललेलो नाही. याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे,’ माझी तोंडी चुकीचे वक्तव्य घालण्यात आले आहे. असं स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पुण्यात केलं. तर आज सामनाच्या अग्रलेखातून देखील या घडामोडींवरून सरकार पडण्याचा मनसुबा असलेल्या विरोधकांना लक्ष्य केलं आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ‘पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा जो सोहळा पार पडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाट्य वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले’ अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे.
सामना अग्रलेख-
सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न करीत होते ते अधिकारी कोण? याहीपेक्षा काही झाले तरी भाजपचेच सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण, ते महत्त्वाचे. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले.
फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली, पण विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र शपथ घेतलेले मुख्यमंत्रीच यापुढे कायम राहतील, जुनीच व्यवस्था पुढे चालू राहील असे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस व प्रशासकीय सेवेतले बडे अधिकारी ‘स्युमोटो’ नव्या सरकारची रंगसफेदी करण्याच्या आणि भेगा बुजवण्याच्या कामास लागले.
मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळय़ा पद्धतीने जाळय़ात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करीत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते, पण त्यांचे काहीच चालले नाही. फडणवीसांचे सरकार कोसळले व महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणणारी ‘झांसे’की रानी भाजपच्या पाठींब्यामुळे शेफारली’
- राजेश टोपेंची पुण्यातील ‘वादग्रस्त जम्बो कोव्हिड’ रुग्णालयाला भेट
- मोठी बातमी : रामविलास पासवान आयसीयूमध्ये दाखल, चिराग पासवान यांचे भावनिक पत्र
- कृषी विधेयकामुळे कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळेल- राधाकृष्ण विखे
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या संप पुकरण्यावर येणार बंधनं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

