पुणे : पुण्यातील एका पत्रकारचा रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने दुर्देवी निधन झाले होते. तर पुण्याचे माजी महापौरांना देखील पुणे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आपला जीव गमवावा लागला. मृत्यू नंतरही त्यांचा त्रास कमी झाला नव्हता तर त्यांनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा त्यांना जागा उपलब्ध होत नव्हती.
राज्य सरकार , पुणे प्रशासन यांच्याकडून कोरोना रुग्णांना योग्य सुविधा नाहीत. या असुविधेमुळे अनेक नागरिक बळी पडत आहेत. जे हलगर्जीपणा करत आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. पुण्यातील या जम्बो कोव्हिड रुग्णालयातील दुरावस्थेची दखल उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील योग्य कारवाईचे आदेश देत रुग्णांची भेट घेतली होती.
आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यातील सीओईपी ग्राउंडवरील जम्बो कोव्हिड सेंटरला भेट दिली आहे. येथील सेवासुविधा तसेच उपचारांविषयी थेट रुग्णांना भेटून त्यांनी विचारणा केली आहे. यावेळी त्यांनी रुग्णांना गुलाब सॅनिटायझर आणि मास्क देखील दिले. खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या रुग्णालयाला भेट दिल्यामुळे येत्या काळात कोणत्याही असुविधेला रुग्णांना सामोरे जावे लागणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- वाचाळ कंगना पुन्हा बरळली, शेतकऱ्यांची तुलना केली दहशतवाद्यांशी
- सरकार पाडण्याची क्षमता अधिकाऱ्यांच्यात नाही, ‘ते’ उगवत्या सूर्याला नमस्कार करतात! सामनातून टीका
- किमान निर्यात शुल्क आकारून कांदा निर्यातीस परवानगी द्यावी- सुजय विखे
- संदीप देशपांडेंनी केला लोकल प्रवास; मनसेकडून सविनय कायदेभंग
- कृषी विधेयकामुळे कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळेल- राधाकृष्ण विखे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

