नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सध्या उपचारासाठी अतिदक्षता विभागात ICU हलवण्यात आले आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, रामविलास पासवान यांची प्रकृती खालावल्यामुळे चिराग पासवान यांना बिहारमध्ये जाणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर रामविलास पासवान यांचे सुपूत्र चिराग पासवान यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहले आहे.
या पत्रात चिराग पासवान यांनी वडिलांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचा उल्लेख करत भावनिक होत म्हटले आहे की, “आज मी हे पत्र लिहित असताना, वडिलांना रोज आजाराशी लढताना पाहत आहे. एक मुलगा या नात्याने वडिलांना रुग्णालयात पाहून अतिशय अस्वस्थ वाटत आहे.”

बिहार विधानसभा निवडणूक जवळ आलेली असूनही पटणा येथे जाण्यास असमर्थ असल्याचे सांगत, चिराग पासवान यांनी सांगितले की, , “वडिलांनी मला अनेकदा पटणा येथे जाण्याचा सल्ला दिला. मात्र मुलगा या नात्याने वडिलांना आयसीयूमध्ये सोडून कुठंही जाणं माझ्यासाठी शक्य नाही. आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, तेव्हा मला त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे. नाहीतर तुमचा सर्वांचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःला माफ करू शकणार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणणारी ‘झांसे’की रानी भाजपच्या पाठींब्यामुळे शेफारली’
- राजेश टोपेंची पुण्यातील ‘वादग्रस्त जम्बो कोव्हिड’ रुग्णालयाला भेट
- लोकलसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन
- कृषी विधेयकामुळे कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळेल- राधाकृष्ण विखे
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या संप पुकरण्यावर येणार बंधनं


